‘इंडियन मॅचमेकिंग’मधून न दिसणारी भारतीय विवाहातली एक कुरूप बाजू
आंतरजातीय विवाहाच्या संदर्भात पालक केवळ समाजाचा भाग नाहीत, तर ते स्वतः एक समाज आहेत, जे ‘सामाजिकदृष्ट्या विवाहसंबंधात एकमेकांच्या बरोबरीचे नसणे’ या जातीव्यवस्थेच्या घातक अंधश्रद्धेला मिटवू शकतात. आंतरजातीय विवाहाला त्यांची केवळ होकारात्मक संमती भारतीय समाज व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणणार नाही, परंतु ‘सामाजिकदृष्ट्या विवाहसंबंधाठी बरोबरीचे नसणे’ हा कलंक पुसून टाकण्याची पुरेशी क्षमता त्यात आहे.......